India vs Australia 3rd Test | पैज हरल्याने काढली 'अर्धी मिशी'; क्रिकेटवेड्याने दिलेला शब्द पाळला

India vs Australia 3rd Test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. त्यातही भारतीय क्रीडा रसिकांमध्ये तर, या संपूर्ण मालिकेबाबत कमालीची उत्सुकता दिसत आहे. हीच उत्सुकता आणि कुतूहल कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतं, याचाच एक प्रत्यय सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. जिथं एका गृहस्थांचा फोटो व्हायरल होत आहे. बरं, हा फोटो व्हायरल होण्यामागे कारणही तसंच आहे.

हे कारण म्हणजे या काकांनी (rohit sharma) रोहित शर्माच्या नावे लावलेली एक पैज हरल्यामुळं थेट स्वत:ची अर्धी मिशीच कापली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाची चांगली सुरुवात केली. रोहित फार, प्रभावी खेळ खेळू शकला नाही. तो, अवघ्या 26 धावा करून बाद झाला.

असं असलं तरीही रोहितनं बाद होण्यापूर्वी एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावे केला. पण, इथं त्याच्या याच खेळीमुळं एका काकांना त्यांच्या मिशीला मुकावं लागलं. तेही अर्ध्या मिशीला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola