KL Rahul Ruled Out | केएल राहुलच्या डाव्या मनगटाला गंभीर दुखापत; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी ही बातमी भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची ठरु शकते.

बीसीसीआयने आज सकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. "मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी सरावादरम्यान फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा अवधी लागेल. तो लवकरच ऑस्ट्रेलियाहून भारतात रवाना होईल. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत," असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola