IND vs SA : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या भीतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा उशिरा?
abp majha web team
Updated at:
02 Dec 2021 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओमायक्रॉन व्हेरियंटच्या भीतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आठवडाभर उशिरानं होण्याची चिन्हं आहेत. सूत्रांच्या हवाल्यानं इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलंय. बीसीसीआयची दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे, असंही या वृत्तात म्हटलंय. दरम्यान, भारतीय संघाचा दौरा होणार असल्याची माहिती क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या प्रमुखांनी दिलीय. संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघाचं वास्तव्य केवळ दोनच हॉटेलमध्ये असेल आणि खेळाडूंसाठी सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.