India ODI World Cup Squad : विश्वचषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार जाहीर, जाणून घ्या नावं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTeam India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. आपेक्षाप्रमाणे 15 खेलाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय संघ फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजासह विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीप यादव याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तर इशान किशन आणि केएल राहुल विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील.
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे.