IND vs PAK T20 World Cup 2022: भारताची पाकिस्तावर थरारक मात, कोहली - पंड्यानं सामना फिरवला
Continues below advertisement
IND vs PAK, T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पार पडलेला सामना यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यापैकी सर्वात थरारक सामना आहे.
Continues below advertisement