ICC T20 NZ vs AFG : अफगाणिस्तान ठरवणार भारताचं भवितव्य, सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट
T20 WC, Semi Final: टी -20 विश्वचषक अखेरच्या टप्यात पोहचला आहे. कोणत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अ गटामधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे. अ गटात उपांत्य फेरीचं गणित खडतर होतं. दक्षिण आफ्रिका संघाला 8 गुण मिळाल्यानंतरही उपांत्य पेरीत पोहचता आलं नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघानं उत्तम नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे. ब गटात पाकिस्तान संघ 8 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचला आहे. मात्र, दुसऱ्या संघासाठी तीन संघ स्पर्धेत आहेत.
भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा आहेत. न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत आणि अफगाणिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. आज, दुपारी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर ब गटातील उपांत्य फेरीतील गणित स्पष्ट होईल. भारतीय संघाचं उपांत्य फेरीच्या आशा न्यूझीलं आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर आहेत. न्यूझीलंड संघानं जर अफगाणिस्तान संघाचा पराभव केला तर भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार आहे. असं झाल्यास ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पात्र ठरणार आहेत. पण जर ब अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला तर मात्र, नेट रनरेटच्या आधारावर उपांत्या फेरीतील संघ ठरवला जाणार आहे. अशा परिस्थिती भारताला अखेरचा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागेल. भारताचा अखेरचा सामना सोमवारी नामेबियाविरोधात आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर 130 कोटी भारतीयांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आज अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडला रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.