Yashpal Sharma Death : भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Continues below advertisement

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यशपाल शर्मा 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. 11 ऑगस्ट 1954 रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये यशपाल शर्मा यांचा जन्म झाला होता. यशपाल शर्मा टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्यही होते. 

मीडिया रिपोर्टनुसार, यशपाल शर्मा (Yashpal Sharma) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करुन परतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. कुटुंबियांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7.40 वाजता त्यांचं निधन झालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram