England VS Sri Lanka Match Highlights: इंग्लंडचा श्रीलंकेवर 26 धावांनी विजय, जॉस बटलरचे झुंझार शतक

Continues below advertisement

England VS Sri Lanka Match Highlights: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 29 व्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला (ENG Vs SL) पराभवाची धूळ चाखली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करीत इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघ 137 धावांवर ऑल-आऊट झाला. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाला 26 धावांनी विजय मिळवता आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram