IND VS AUS | ब्रिस्बेन कसोटीला नाट्यमय कलाटणी, सुंदर-शार्दूलच्या कणखरतेची प्रचिती
Continues below advertisement
IND Vs AUS 4th Score Updates ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे 54 धावांची आघाडी होती. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. आघाडी आणि खेळपट्टीवर असणाऱ्या तगड्या खेळाडूंच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ सुरु करणार आहे. असं असलं तरीही कसोटीचा तिसरा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला तो म्हणजे भारतीय संघातील शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनी.
Continues below advertisement