Cricket : उद्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिका,लोकेश राहुलच्या नेतृत्त्वात Team India मैदानात
Continues below advertisement
आयपीएलच्या आगामी मोसमाआधी येत्या फेब्रुवारीत मेगा लिलाव पार पडणार आहे. पण त्याआधी लखनौ आणि अहमदाबाद संघानं संघबांधणी करताना पहिल्या ३-३ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार लखनौ संघानं टीम इंडियाचा वन डे कर्णधार लोकेश राहुलला आपल्या संघात स्थान दिलंय. तर त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि लेग स्पिनर रवी बिश्नोईचा संघात समावेश केलाय. दुसरीकडे अहमदाबाद संघानं हार्दिक पंड्याची संघात निवड केलीय.
Continues below advertisement