BCCI कडून वानखेडे स्टेडियममध्ये खेळपट्टी बनवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या ग्राऊंड्समेनना 35000 रुपये बक्षीस
Continues below advertisement
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआयकडून वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला ३५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आलं. भारतीय संघानं ही कसोटी तब्बल ३७२ धावांनी जिंकली. त्यामुळंच वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी बनवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या ग्राऊंड्समेनना बीसीसीआयकडून ३५ हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. कानपूर कसोटीपासून बीसीसीआयनं हा एक नवा पायंडा पाडला आहे. कानपूर कसोटीनंतरही बीसीसीआयनं तिथल्या ग्राऊंड स्टाफलाही ३५ हजारांचा धनादेश दिला होता.
Continues below advertisement