Australia vs Netherlands:ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं विश्वचषकाच्या सर्वात वेगवान शतकाचा पराक्रम
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं विश्वचषकाच्या इतिहासातलं सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवलाय. नेदरलँड्सविरुद्ध दिल्लीतल्या सामन्यात मॅक्सवेलनं अवघ्या ४० चेंडूंत शतक झळकावलं. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमच्या नावावरचा ४९ चेंडूंमधल्या शतकाचा विक्रम मोडीत काढला. मारक्रमनं याच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४९ चेंडूंत शतक साजरं करण्याची कामगिरी बजावली होती. दरम्यान, मॅक्सवेलनं नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूंत १०६ आणि डेव्हिड वॉर्नरनं ९३ चेंडूंत १०४ धावांची खेळी उभारली. मॅक्सवेलच्या शतकी खेळीला नऊ चौकार आणि आठ षटकारांचा साज होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत आठ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला आहे.
Continues below advertisement
Tags :
World Cup History Glenn Maxwell David Warner Australia Aiden Markram Fastest Century Feat Vs Netherlands