Ind vs Aus Stumps Day 1 | अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात काय घडलं?

Continues below advertisement
Ind vs Aus Stumps Day 1 | अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात काय घडलं?

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही अॅडिलेड ओव्हलवरच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला. या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला, त्या वेळी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाची सहा बाद 233 अशी कठीण अवस्था केली होती. या सामन्यात विराट कोहलीनं चेतेश्वर पुजाराच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मग त्यानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी उभारली. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्या दोन्ही भागीदारी फोडून भारतीय डावाला वेसण घातली. भारताकडून विराट कोहलीनं 74, चेतेश्वर पुजारानं 43 आणि अजिंक्य रहाणेनं 42 धावांची खेळी उभारली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram