Team India Returns Home | ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडिया मायदेशी, खेळाडूंचं जल्लोषात स्वागत
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना थेट घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.
कोरोनाच्या नियमामुळे विमानतळावर चाहत्यांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी फक्त पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केलं. ज्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली, त्या अजिंक्य रहाणेच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वॉरन्टीनच्या निमयातून वगळण्यात आलं आहे. परंतु प्रत्येक खेळाडूची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचं पालन केलं आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. सोबतच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Tags :
Indian Cricket Team Photos Team India Airport India Australia Series Mumbai Airport Team India IND Vs AUS