Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा

Continues below advertisement

Ajinkya Rahane Syed Mushtaq Ali : भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत ते देशांतर्गत टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई आणि बडोदा यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रहाणेने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली आहे.

अजिंक्य रहाणेचे पुन्हा हुकले शतक 

रहाणेने 56 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. म्हणजे फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने 16 चेंडूत 74 धावा ठोकल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 175 होता. हे त्याचे या हंगामातील पाचवे अर्धशतक होते आणि टी-20 कारकिर्दीतील 48 वे होते. रहाणेच्या या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर मुंबईने 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याचा सहा गडी राखून पराभव केला. रहाणेला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी पुन्हा एकदा सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हा त्याचा सलग तिसरा सामनावीर ठरला आहे.

सय्यद मुश्ताक अलीमध्ये अजिंक्य रहाणेची स्फोटक फलंदाजी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये रहाणेने आतापर्यंत 8 सामन्यांच्या 7 डावात 61.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 432 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 169.41 राहिला आहे. या स्पर्धेत 400 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

रहाणेची या स्पर्धेतील कामगिरी –

13 (13) विरुद्ध गोवा
52 (34) विरुद्ध महाराष्ट्र
68 (35) विरुद्ध केरळ
95 (54) विरुद्ध आंध्र
84 (45) विरुद्ध विदर्भ
98 (56) विरुद्ध बडोदा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram