Chandrakant Pandit यांच्यावर आयपीएलमध्ये मोठी धुरा : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित यांची कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ब्रेण्डन मॅक्युलमऐवजी पंडित यांची कोलकात्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून पंडित यांची ओळख आहे. त्यांनी मुंबई, विदर्भ आणि मध्य प्रदेश या तीन संघांना मिळून सहावेळा रणजी करंडकाचा मान मिळवला आहे. योगायोगाची बाब म्हणजे मुंबईचाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर श्रेयस अय्यर हा सध्या कोलकात्याच्या कर्णधारपदी आहे. त्यामुळं आगामी आयपीएल मोसमात पंडित आणि अय्यर या मुंबईच्या जोडगोळीकडून कोलकात्याला मोठी अपेक्षा राहिल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram