BCCI Schedule : Mumbai पुण्यात होणार साखळी सामने,आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर : ABP Majha
आयपीएलच्या १५व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक आज बीसीसीआयनं जाहीर केलंय. या नव्या हंगामात गतविजेती चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये सलामीचा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २६ मार्चला संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात आठऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे यंदा खेळवल्या जाणाऱ्या साखळी सामन्यांची संख्या ७० इतकी असणार आहे. कोरोनामुळे फक्त मुंबई आणि पुण्यातल्या चार स्टेडियम्समध्ये हे सामने पार पडणार आहेत. त्यात वानखेडे आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २० तर ब्रेबॉर्न आणि पुण्यात १५ सामने होतील.