Sachin Tendulkar | मुंबईत रस्ता चुकलेल्या सचिनला रिक्षा चालक म्हणतो'फॉलो मी' सचिनने शेअर केला किस्सा
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबूकवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईकर सचिन मुंबई रस्ता चुकला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण स्वत: सचिनने याची कबुली दिली. नुसती कबुली नाही तर नेमकं काय घडलं या सगळ्या प्रसंगाचा व्हिडीओच शूट केला आहे. एकेदिवशी सचिन मुंबईत रस्ता चुकला होता. त्यावेळी त्याला मुंबईतील एका मराठी रिक्षा चालकाने कशी मदत केली, असा सगळा प्रसंग सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.