Web Exclusive : पाकिस्ताननं सामना कुठं गमावला? ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचं विश्लेषण
T20 World Cup 2021 : Pakistan vs Australia 2nd Semifinal : विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केलाय. मॅथ्यू वेडच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केलाय. भारताविरोधात हिरो ठरलेल्या शाहीन शाह आफ्रिदीच्या एकाच षटकांत मॅथ्यू वेडनं सामना फिरवला. मॅथ्यू वेडच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिसनं हारलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात असमाधानकारक झाली. सुरुवातीलाच कर्णधार फिंच स्वस्तात माघारी परतला. एकतर्फी विजय मिळवण्याच्या दिशेनं पाकिस्तानने आगेकूच केली होती. मात्र, मॅथ्यू वेडनं 17 चेंडूत 41 आणि स्टॉयनिसनं 31 चेंडूत 40 धावांची खेळी करत सामना फिरवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं नेमकं गुपित काय?
महत्वाच्या सामन्यात विजयाचं ऑस्ट्रेलियाचं गणित काय? पाकिस्ताननं सामना कुठं गमावला? ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचं विश्लेषण