Asia Cup Indian Squad : आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर, रोहित शर्मा करणार नेतृत्व ABP Majha

30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलीय.  अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील १७ जणांच्या संघाची घोषणा झालीय. कर्णधारपदी रोहित शर्मा तर  हार्दिक पांड्याची उप कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर युवा फलंदाज तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आलाय.  केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळाले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे. २ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola