FIFA World Cup 2022 : 36 वर्षांची प्रतिक्षा संपली, अर्जेंटीनानं जिंकला FIFA World Cup
Continues below advertisement
ARG vs FRA, Fifa World Cup 2022 Final : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (Fifa WC) अंतिम सामन्यात (Fifa World Cup 2022 Final) फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला. आधी अतिरिक्त वेळ त्यानंतर पेनल्टी शूटआऊट असं सारंकाही असणाऱ्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आहे. विशेष म्हणजे ज्या मेस्सीसाठी (Lionel Messi) अर्जेंटिनाला हा कप जिंकायचा होता, त्या मेस्सीनेच सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले. विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज (Emiliano Martinez) याने उत्कृष्ट खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली.
Continues below advertisement