Ajinkya Rahane Back : जागतिक कसोटी विजेतेपद फायनलसाठी रहाणेची निवड, भारताच्या कसोटी संघात पुनरागमन

Continues below advertisement

मुंबईच्या अजिंक्य रहाणेनं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलसाठी तब्बल १५ महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही फायनल ७ ते ११ जून या कालावधीत इंग्लंडमधल्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल. अजिंक्य रहाणेचा यंदाच्या आयपीएल मोसमातला फॉर्म लक्षात घेऊन त्याला जागतिक कसोटी विजेतेपद फायनलसाठी संधी देण्यात आली असं म्हणण्यात येत आहे. कारण चेन्नईच्या कोलकात्यावरच्या विजयात त्यानं निर्णायक भूमिका बजावली होती. अजिंक्यनं त्या सामन्यात २९ चेंडूंत ७१ धावांची खेळी उभारली होती. पण भारताच्या कसोटी संघामधल्या पुनरागमनासाठी अजिंक्यला राष्ट्रीय सामन्यांमधली सातत्यपूर्ण कामगिरी अधिक फळली आहे.दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०२२मधल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला सातत्यानं भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं. बीसीसीआयच्या कॉण्ट्रॅक्ट यादीतही अजिंक्यचा यंदा समावेश करण्यात आला नव्हता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram