VIDEO | ज्युनियर मिस्टर इंडिया राज सुर्वेशी खास बातचीत | खेळ माझा | मुंबई | एबीपी माझा
महाराष्ट्राचा राज सुर्वे ज्युनियर गटात मिस्टर इंडिया किताबाचा मानकरी ठरला आहे. जम्मू काश्मीर शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीनं आयोजित ५७व्या ज्युनियर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज सर्वोत्तम ठरला. या स्पर्धेत २१ राज्यांतून २१० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. राज हा बोरीवली मागाठणे विभागाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव आहे. तो सध्या सध्या सिव्हिल इंजिनियरींगचं शिक्षण घेत असून त्याला व्यायामाचीही गोडी आहे. राज हा दादरच्या व्ही फिटनेस जिममध्ये विशाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करतो.