सोलापूर : एक धड आणि दोन शीर... सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात विचित्र बाळाचा जन्म

Continues below advertisement
एक धड आणि दोन शीर असलेला बालक सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात जन्माला आल्यानं खळबळ उडाली. एक लाख रुग्णांमध्ये क्वचितच असे प्रकार घडतात, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विडी घरकुल परिसरातल्या कष्टकरी महिलेनं या बाळाला जन्म दिला. या बाळाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून शासकीय रुग्णालयाची विशेष टीम उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आली. दोन डोकी असलेलं बाळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच जन्माला आल्यानं डॉक्टरही अचंबित झाले. सध्या या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram