VIDEO | उन्हाळ्यात शीतली प्राणायाम, शवासनाने दूर होईल उष्णता | योग माझा | दोन मिनिटांत योग | एबीपी माझा
Continues below advertisement
उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही कित्येक प्रकारचे उपाय करता, परंतु जर नियमितपणे काही वेळ ही योगासने केलीत तर उष्णता कमी होऊ शकते. यामुळे मेंदूदेखील शांत राहण्यास मदत होते.
प्रथम संपूर्ण शरीराला सैल आणि शांत ठेवा आणि डोके, घसा आणि पाठीच्या कण्याला योग्य स्थितीमध्ये ठेवून आरामात बसा. या प्राणायामात तोंड उघडून जिभेला नालीसारखे करा आणि नालीद्वारे हळूहळू श्वास आत ओढा. नंतर तोंड बंद करून काही वेळापर्यंत श्वास आत रोखून ठेवा. नंतर नाकाने श्वास सोडा. असे आठ ते दहा वेळा करा.
Continues below advertisement