पुणे : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मार्केटयार्डमध्ये आज भाजी, फळांची आवक बंद
पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये आज भाजी आणि फळांची आवक पूर्णपणे बंद आहे. सकल मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अडते-व्यापारी संघटना, हमाल-कामगार संघटना यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. मार्केटयार्डबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सध्या बाजारात पुरेशी फळं आणि भाजीपाला असल्यामुळे पुणेकरांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.