उस्मानाबाद | परतीच्या पावसाची शक्यता कमी - हवामान विभाग
परतीच्या पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह जळगाव, धुळे, सांगली अश्य़ा १७ जिल्ह्यांमध्ये स्थिती बिकट होणार आहे. एकटा पुणए जिल्हा सोडला तर इतर २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे २२ सप्टेंबरला सूर्याचं दक्षिणायन सुरु होणार आहे.