Nitin Gadkari | नितीन गडकरींनी रस्ते विकास मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय रस्ते विकास मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा पदभार स्वीकारला आहे. यावेळी गडकरींसोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरीही उपस्थित होत्या. 2014 प्रमाणेच यंदाही गडकरींनी रस्तेविभाग आणि दळणवळणाचं खातं देण्यात आलं आहे. 2014 च्या कारकिर्दीत मध्ये नितीन गडकरींनी दळणवळण मंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. यंदा मात्र आधीचे प्रकल्प पूर्ण करणं आणि त्याचबरोबरच नवे प्रकल्पही उभारणं हे गडकरी यांच्यापुढचं नवं आव्हान असणार आहे. यासोबत गडकरींनी लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभारही त्यांनी स्वीकारला.
Continues below advertisement