Ujjwal Nikam | मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टर माईंड झकी उर लखवीला 15 वर्षांची शिक्षा
Continues below advertisement
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीऊर रेहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता.
दहशतवाद्यांना फंडिंग केल्या प्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी पथकाने (सीटीडी) झकीऊर रेहमान लखवीला अटक केली होती. दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवण्यात आल्याचा आरोप ठेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाच्या मते, झकीऊर रेहमान लखवीने दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्या माध्यमातून त्याने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले.
Continues below advertisement