YouTube & Google Services Down | तांत्रिक कारणामुळे युट्यूबसह गूगलच्या इतर सेवा बंद
Continues below advertisement
मुंबई : जगभरात यूट्यूब आणि जीमेलची सेवा ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यू्टयूब आणि जीमेल डाऊन डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी यूजर्सनी केल्या आहे. सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गुगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. जीमेल, युट्यूब, गुगल हँगआऊट, गुगल प्ले स्टोअर सेवा सुरु करण्यात अडचण येत आहे. अद्याप सेवा ठप्प होण्याचे कारण गुगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. जीमेलची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
Picture Credit : Getty Images
Continues below advertisement