Jitendra Awhad Controversy | ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्यासमोर बेदम मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप, आव्हाडांनी आरोप फेटाळले
Continues below advertisement
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. कासारवडवली येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव अनंत करमुसे आहे तो चाळीस वर्षांचा आहे. वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात अनोळखी व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याने रविवारी रात्री फेसबुक आणि ट्विटरवर केलेल्या पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे.
ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी घेतली आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मला काहीही माहिती नाही आणि तर रात्री मी नेहमीप्रमाणे गाढ झोपेत असल्याचे म्हटले आहे. तसेच या तरुणावर त्यांनी प्रत्यारोप केला असून दाभोळकर पानसरे यांच्या हत्येत या तरुणाचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे.

Tags :
Thane Jitendra Awhad Jitendra Awhad Bungalow Jitendra Awhad Controversy Maharashtra Lockdown Jitendra Awhad Thane