Yes Bank Rana Kapoor | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची ईडीकडून कसून चौकशी
Continues below advertisement
मुंबई : येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईतल्या वरळीमधल्या समुद्र महल या अलिशान इमारतीत राहणाऱ्या राणांच्या घरी ईडीनं जवळपास 12 तास चौकशी केली. यावेळी राणा यांच्या घरातून कागदपत्र आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले आहेत. तसंच ईडीनं मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत गुन्हाही दाखल केलाय. त्यानंतर राणा कपूर यांना ईडी कार्यालयात बोलवून त्यांची चौकशी सुरु आहे. DHFL, CCD आणि IL&FS या कंपन्यांना दिलेली कर्ज थकल्यानं राणा यांच्यावरचा संशय बळावला आहे. दरम्यान राणा कपूर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement