Yavatmal Unseasonal Rain : अवकाळीची अवकृपा, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवलेला शेतमाल मातीमोल
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय... यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झालाय. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेत.. या पावसामुळे 400 हेक्टरवरील फळबागा, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोयाबिन, ज्वारी, या पिकांचं मोठं नुकसान झालंय. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि सर्वे हे केवळ एक शासकीय सोपस्कार तर होत नाही नाही ना ? असा देखील सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जातोय..
Continues below advertisement