Yavatmal Rain Updates : यवतमाळमध्ये पावसाचा कहर, पुराच्या पाण्यात 45 जण अडकले

यवतमाळच्या घाटंजीमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले सध्या तुडूंब भरून वाहतायत. घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीला पूर आलाय.. त्यामुळं पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीयेे... या मुसळधार पावसामुळे  नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. घाटंजीमधल्या आगपुरी, मुरली आणि खापरी या गावांतही पाणी शिरलंय. त्यामुळे घाटंजी ते यवतमाळ आणि पांढरकवडा दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आलाय..त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola