Yavatmal Dhananjay Munde Help : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदत

यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी  घेतलीय. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी धनंजय मुंडेंची यवतमाळमध्ये भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकरी नवरा गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न महिलेनं मुंडेंना केला. तसंच, सरकारचीही मदतही मिळाली नसल्याचे तिनं मुंडेंना सांगितले. यावेळी चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola