Yavatmal : 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा गरीबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला
राज्यातील एक लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारलाय. आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला दिल्यात. आतापर्यंत या नोकरदार वर्गाने रेशन कार्डवर ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याची उचल केल्याचं उघड झालंय.