Yavatmal Flood Rescue Operation : यवतमाळमध्ये पावसाचा हाहा:कार, बचावासाठी हेलिकॉप्टर दाखल
यवतमाळ आणि बुलढाण्यात तुफान पाऊस सुरु आहे...सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला, तर अनेक सखल भाग पाण्याखाली गेलेत.. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अनंतवाडी गावाला पुराने वेढलंय.. गावातील ४५ जण पुरात अडकलेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सध्या यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरु आहे