
Yavatmal Farmers : यवतमाळमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे सुरु पण अद्याप मदत नाही
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाहणी दौऱ्यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागलंय. महागाव तालुक्यात नुकसान भरपाईचे पंचनामे ऑन फिल्ड सुरू झालेत. तर गावा-गावातील तलाठी आणि अधिकारी नुकसानीचे पंचनामे करत आहेत. मात्र, अद्यापही पाच हजारांची मदत मिळाली नसून, शेतकऱ्यांचे डोळे आता प्रत्यक्ष मदतीकडे लागलेत.
Continues below advertisement