Prakash Ambedkar : आम्ही प्रस्ताव दिला, आता प्रतिसादाची प्रतिक्षा : प्रकाश आंबेडकर
वंचित आघाडीला उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेस यापैकी कोण टाळी देणार? याची आता प्रकाश आंबेडकर यांनाही प्रतीक्षा आहे. काल यवतमाळमध्ये बोलताना आंबेडकरांनी तसं स्पष्ट वक्तव्य केलं. शिवसेना किंवा काँग्रेसबरोबर युतीचा जाहीर प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी आधीच दिलाय. पण त्याला दोन्ही पक्षांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नवी राजकीय समीकरणं जुळणार की नाही याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी काय वक्तव्य केलंय पाहुयात...