Recession India : 2023मध्ये जगभरात आर्थिक मंदीची शक्यता, भारतावर काय परिणाम होणार?
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली असली तरी २०२३मध्ये जागतिक मंदीची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. २०२३मध्ये जगातल्या अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलाय. त्यामुळे भारतासह जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांसमोर आव्हान उभं राहणार आहे. लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचं प्रमाण आणखी वाढू शकतं असं भाकीत आयएमएफच्या क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी केलंय.
Continues below advertisement