Web Exclusive : मुंबईच्या 7 पट मोठा हिमनग तुटला, याचे नेमके पर्यावरणावर काय परिणाम होणार?
ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम नेमके काय असतात, याचं उदाहरण अंटार्क्टिकामध्ये पाहायला मिळालं. अंटार्क्टिकामध्ये जगातील सर्वात मोठा हिमनग तुटला आहे. अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग तुटताना युरोपीय स्पेस एजन्सीच्या उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये दिसला. जागतिक तापमानवाढीचे हे परिणाम विचार करायला भाग पाडणारे आहे. याच विषयी आपण पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत भावे यांनी दिली महत्त्वाची माहिती.