ISRO Vikram Lander: विक्रम लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली - ए. एस. किरणकुमार
Continues below advertisement
आता बातमी आहे विक्रम लँडरसंदर्भातली...
भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर गेल्यानंतर आता ते पुन्हा सक्रीय होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं आता सांगण्यात येतंय.असं मत इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी व्यक्त केलंय.. किरणकुमार हे चंद्रयान-३ मोहिमेत सक्रिय सहभागी होते. तसंच चंद्रावर नवा दिवस सुरू झाल्यानंतर इस्रोने २२ सप्टेंबर रोजी म्हटलं होतं की, सौर ऊर्जेवर चालणारं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना पुन्हा कार्यान्वत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र त्यांच्याकडून अद्याप तरी कोणतेही संकेत मिळालेले नसल्याचंही बोललं जातंय..
Continues below advertisement