काबूल स्फोटांची मालिका... ISIS खूरासान गटानं घेतली हल्ल्याची जबाबदारी, अमेरिकेची युद्धाची तयारी

एकापाठोपाठ एक सलग तीन स्फोटांनी काबूल हादरलं. काबूल विमानतळावर झालेल्या या स्फोटांत 172 जणांचा मृत्यू झालाय. तीन आत्मघातकी हल्ल्यात तेरा अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यात अफगाणी नागरिकांना प्राण गमवावे लागले असून 140 हून अधिक जण गंभीररित्या जखमी झालेत. या स्फोटानंतर काबूल विमानतळावर एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू झाली. या स्फोटांची जबाबदारी आयसिस खोरासाननं स्वीकारलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola