H-1B Visa| अमेरिकेतील भारतीयांचं भवितव्य अंधारात,H-1B सह इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार

Continues below advertisement

कोरोनामुळे जगभरात आलेल्या मंदीवर उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप प्रशासनानं H1-B व्हिसा सह इतर व्हिसाही रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे अमेरिकेत आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या व्यापार-उद्योगामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागलाय. अमेरिकेचं नवं आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबरपासून सुरु होतंय,त्यावेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसंच H1-B व्हिसावर नोकरीसाठी कुणालाही देशात येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram