पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार, म्हणाले सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं
Continues below advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी (16 मे) रात्री उशिरा केली. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करू असं ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्वीटनंतर ट्रम्प यांचे आभार मानले.
Continues below advertisement