US Presidential Election 2020 | इलेक्टोरल वोटिंगमध्ये बायडन आघाडीवर
Continues below advertisement
अमेरिकेत नवीन राष्ट्रपतीपदासाठी मतगणना सुरु आहे. आतापर्यंत 50 पैकी 22 राज्यांचे निकाल हाती आले असून 12 राज्यांमध्ये ट्रम्प तर 10 राज्यांमध्ये बायडन यांनी विजय मिळवला आहे. तर इलेक्टोरल मतदानामध्ये डेमोक्रेटचे उमेदवार बायडन हे ट्रम्प यांच्या पुढे आहेत. जो बायडन यांना आतापर्यंत 129 तर ट्रम्प यांना 94 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिकेत एकूण इलेक्टर्सची संख्या 538 आहे आणि बहुमतासाठी 270 चा आकडा गाठायचा आहे. मतगणनेच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षेची व्यवस्था केली आहे.
अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
Continues below advertisement
Tags :
US Presidential Elections Donald Trump US Presidential Election 2020 US Election US Election 2020 India Joe Biden