
US Presidential Elections 2020 | निवडणूक जिंकत असल्याचा जो बायडेन यांचा दावा
Continues below advertisement
अमेरिकेत मागील चार दिवसांपासून मतगणना सुरु आहेत. अद्यापही अमेरिकेचा राष्ट्रपती होणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. मात्र सध्या बायडन हे आघाडीवर असून ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बायडन यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. जो बायडन म्हणाले की, आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होणार आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्हाला 7.40 कोटींहून अधिक मतं मिळाली आहेत, जे आजवरच्या अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मतं आहेत. व्हाईट हाउसमध्ये पोहोचण्यासाठी उमेदवाराला 538 ‘इलेक्टोरल कॉलेज वोट’ पैकी 270 मतं मिळवणं गरजेचं आहे. ताज्या आकडेवारीनुसार बायडन यांना 264 इलेक्टोरल कॉलेज वोट मिळाले आहेत तर ट्रम्प यांना 213 मतं मिळाली आहेत.
Continues below advertisement