Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान पॉम हाऊस आणि रिसॉर्ट मार ए लीगोवर छापेमारी

Continues below advertisement

Donald Trump : अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान पॉम हाऊस व रिसॉर्ट मार ए लीगोवर छापेमारी केली. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एफबीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या घराला घेराव घातला आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी या छापेमारीची पुष्टी केली आहे. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय. एफबीआयच्या प्रवक्त्यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ट्रम्प यांच्या  विश्वासूंनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, ही छापेमारी कोणत्याही नोटीशीविना करण्यात आली. एफबीआयच्या धाडीवेळी ट्रम्प तिथे उपस्थित नव्हते. सध्या ते न्यूजर्सीत असल्याचे सांगण्यात येते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram