Ukrainian Plane Crash | युक्रेनचं विमान चुकून पाडलं, इराणच्या लष्कराची कबुली | ABP Majha
Continues below advertisement
युक्रेनचं प्रवासी विमात काही दिवसांपूर्वी इराणमधील तेहरान विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. मात्र हे विमान चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे. इराणच्या या चुकीमुळे विमानतील 176 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यात इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना 8 जानेवारीला समोर आली होती. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या हल्ल्यातच युक्रेनचं विमान कोसळल्याचा दावा अमेरिका आणि कॅनडाने केला होता. आता इराणनेही चूक मान्य करत अनावधानाने युक्रेनचं विमान पाडल्याचं कबूल केलं आहे. या 176 प्रवाशांमध्ये इराणच्या 82, कॅनडाच्या 63, युक्रेनच्या 11 प्रवाशांचा आणि 11 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
Continues below advertisement