Nobel Peace Prize 2021: 'या' दोन देशांच्या पत्रकारांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर
यंदाचा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा (Maria Ressa) आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह (Dmitry Muratov) यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रीस-अँडरसन यांनी शुक्रवारी विजेत्यांची घोषणा केली.